अजिंठा लेणी

अजिंठा लेणीत ३० (अंदाजे) खडकाळ-बौद्ध लेणी स्मारक आहेत जी ई.पू. दुसर्या शतकापासून ते इ.स.पू.४८० पर्यंतच्या महाराष्ट्र राज्यातील औरंगाबाद जिल्ह्यात आहेत. या लेण्यांमध्ये चित्रित आणि रॉक-कट शिल्पांचा समावेश आहे. प्राचीन भारतीय कलेचे, विशेषत: अभिव्यक्त चित्रे जे गेश्चर, पोज आणि फॉर्मद्वारे भावना सादर करतात. अजिंठा हे महाराष्ट्रातील पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहे. हे फर्दापूरपासून ६ किलोमीटर (३ .७ मैल) अंतरावर आहे, जळगाव शहरापासून ५९ किलोमीटर (३७ मैल) तसेच शेंदूर्णी शहरापासून २३ किलोमीटर अंतरावर आहे. याठिकाणी जाण्यासाठी महाराष्ट्र शासनामार्फत बसेस ची सुविधा आहे.
त्रिविक्रम मंदिर
जळगाव जिल्ह्यातील जामनेरपासून अवघ्या 16 किलोमीटरवर हे मंदिर आहे. तसेच पाचोरा येथूनही शेंदूर्णी येथे जाण्यासाठी खाजगी वाहन सहज उपलब्ध होतात. औरंगाबादहून सोयगावमार्गे शेंदुर्णीला पोहचता येते.
या मंदिराच्या स्थापनेमागेही आख्यायिका आहे. श्री संत कडोजी महाराज मंदिरातील गादीचे आठवे वारसदार शांताराम महाराज भगत यांनी ही आख्यायिका सांगितली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीसंत कडोजी महाराज दरवर्षी विठ्ठलचे दर्शन घेण्यासाठी पायी वारी करत असत. एकदा ते कार्तिक शुध्द एकादशीला पंढरपूरला निघाले असता वाटेतच त्यांना पांडुरंगाचा साक्षात्कार झाला. ‘अरे मी तुझ्याच गावास असून तू एवढ्या लांब कशासाठी निघालास, तुझ्या शेंदुर्णी नगरीत असलेल्या उकिरड्याखाली मी आहे. माझे वाहन वराह आहे. तू मला वर काढून माझी स्थापना कर.’ या साक्षात्कारानंतर कडोजी महाराज वारी अर्ध्यातच थांबवून शेंदुर्णीला परतले. झालेला प्रकार गावकर्यांना सांगितला. परंतु, गावकर्यांनी त्यांना वेड्यात काढले. मात्र, महाराजांची पांडुरंगाच्या साक्षात्कारावर दृढ श्रद्धा होती. अखेर त्यांनी स्वत: उकिरडा खोदायला सुरवात केली. खोदतानाच काही फुटावरच पांडूरंगाने सांगितल्याप्रमाणे पाषाणाचा भव्य वराह बाहेर निघाला. आता गावकर्यांचा महाराजांवर विश्वास बसला. मग तेही या खोदकार्यात सामील झाले. अवघ्या 25 फुटावर काळ्या पाषाणातील साडेचार फुटाची पांडुरंगाची मूर्ती बाहेर आली. तीच मूर्ती सध्या मंदिरात आहे.