प्रधानमंत्री आवास योजना (शहरी)
प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत खालील ४ ही घटकांमधील पात्र लाभार्थीचे अर्ज स्वीकारले जात आहेत.
घटक क्र. | १ (ISSR) | २ (CLSS) | ३ (AHP) | ४ (BLC) |
योजनेच्या उपबाबी | जमिनीचा साधन संपत्ती म्हणून वापर करून त्यावरील झोपडपट्टयांचा आहे तिथेच पूर्ण विकास करणें. | कर्ज संलग्न व्याज अनुदानाच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल व अल्प उत्पन्न घटकासाठी परवडणाऱ्या घरांची निर्मिती करणे (नवीन घर घेणे, बांधणे.) | खाजगी भागीदारीद्वारे परवडणाऱ्या घरांची निर्मिती करणे. खाजगी विकासकाच्या सहाय्याने परवडणाऱ्या घरांची निर्मिती करणे. | आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लाभार्थीद्वारे व्यक्तिगत स्वरूपातील घरकुल बांधण्यास अनुदान. |
बांधकामाचे कमाल क्षेत्रफळ | ३२२ चौ.फुट क्षेत्रापर्यंत | ३४४ चौ.फुट क्षेत्रापर्यंत | ३२२ चौ.फुट क्षेत्रापर्यंत | ३२२ चौ.फुट क्षेत्रापर्यंत |
मिळणारे अनुदान | रु.२ लाख | ६.५% सवलती दराने रु.६ लाखाचे कर्ज | रु.२.५० लाख | रु.२.५० लाख |
योजनेकरिता पात्रता | शासकीय जागेतील झोपडपट्टी वरील राहण्यास योग्य जागेवर व आरक्षण नसलेल्या जागेवर अतिक्रमण करून राहणाऱ्या कुटुंबाकरिता | वार्षिक उत्पन्न ६ लाखापेक्षा कमी असल्यास तसेच स्वमालकीच्या जागेवर राहणाऱ्या कुटुंबाकरिता | वार्षिक उत्पन्न ३ लाखापेक्षा कमी असल्यास तसेच भाडेकरू, बेघर, आरक्षित कथीत जागेवर राहणाऱ्या कुटुंबाकरिता. | वार्षिक उत्पन्न ३ लाखापेक्षा कमी असल्यास तसेच स्वमालकीच्या जागेवर राहणाऱ्या कुटुंबाकरिता |
लाभार्थ्यांनी सादर करावयाची कागदपत्रे. १) कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधारकार्ड. २) निवडणूक मतदार ओळखपत्र ३) निवासी पुरावा – घरपट्टी, पाणीपट्टी, विद्युत बिल या कागदपत्रापैकी एक. ४) बँकेचे पासबूक ५) सक्षम अधिकाऱ्याकडून उत्पन्नाचे प्रमाणपत्र ६) भारतात स्वामालकीचे पक्के घर कुठेही नसल्याचे प्रतिज्ञापत्र ७) कुटुंबातील सदस्यांचा राहते घर / जागेसह फोटो ८) पती-पत्नीचा पासपोर्ट फोटो ९) जागा मालकीबाबतचे कागदपत्र – जागेचा ७/१२ उतारा, सिटी सर्वे उतारा यापैकी एक. १०) दिव्यांग असल्यास दिव्यांग प्रमाणपत्र ११) विधवा / घटस्फोटीत असल्यास पुरावा १२) रेशन कार्ड १३) सक्षम अधिकाऱ्याने दिलेल्या जातीच्या प्रमाणपत्राची साक्षांकित प्रत १४) चालू वर्षाचे न. प. मालमत्ता कर भरल्याच्या पावतीची प्रत १५) रहिवासी प्रमाणपत्र |
रमाई आवास योजना
शेंदुर्णी नगरपंचायत क्षेत्रातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील नागरिकांना याद्वारे सूचित करण्यात येते की, महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राबविण्यात येणारी रमाई आवास योजना (शहरी) अंतर्गत SECC-2011 च्या प्राधान्यक्रम यादीच्या निकाषाबाहेरील व रु.३ लक्षपर्यंत उत्पन्न मर्यादा असलेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील इच्छुक लाभार्थ्यांनी शेंदुर्णी नगरपंचायत कार्यालयाशी संपर्क साधून विहित नमुन्यात अर्ज खालील आवश्यक कागदपत्रासह सादर करणे आवश्यक राहील.
लाभार्थ्यांनी सादर करावयाची कागदपत्रे.
- जागेचे मालकीबाबत, जागेचा ७/१२ चा उतारा, सिटी सर्वे उतारा यापैकी एक.
- घरपट्टी, पाणीपट्टी, विद्युत बिल या कागदपत्रापैकी एक.
- सक्षम अधिकाऱ्याने दिलेल्या जातीच्या प्रमाणपत्राची साक्षांकित प्रत
- सक्षम अधिकाऱ्याने दिलेल्या रहिवास प्रमाणपत्राची साक्षांकित प्रत
- सक्षम अधिकाऱ्याकडून उत्पन्नाचे प्रमाणपत्र
- कुटुंबातील सदस्यांचा जागेसह फोटो
- लाभार्थ्याचे आधार कार्ड
- अतिरिक्त दाखले – खालील नमूद केलेले कागदपत्रे / दाखले पुरावे ग्राह्य धरण्यात येतील.
- दि.०१/०१/१९९५ च्या किंवा मतदार यादीतील नावाचा उतारा
- निवडणूक मतदार ओळखपत्र
- रेशन कार्ड
- चालू वर्षाचे न. प. मालमत्ता कर भरल्याच्या पावतीची प्रत